Maharashtra Politics : राज्यात विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. भाजपने संख्याबळापेक्षा एक जागा अधिकची निवडून आणत सर्व पाच उमेदारवांना जिंकून आलं. तर आवश्यक संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागाल.
ज्या विधानपरिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटलं, त्या निवडणुकीत विजयी झालेल्या दहा आमदारांचा आज शपथविधी आज संपन्न झाला.
विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या शपथविधी समारंभात भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर, काँग्रेकडून भाई जगताप, शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
भाजपने विजय खेचून आणला
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. तर, दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या दोघांना रिंगणात उतरवले होते. विधानपरिषदेच्या एका जागेवर निवडून येण्यासाठी 26 मतं आवश्यक होती. काँग्रेसकडे ४४ आमदारांचे संख्याबळ असल्याने यापैकी एक उमेदवार सहज विजयी होईल, असे मानले जात होतं. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना विजयासाठी झगडावं लागलं.
दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली असता काँग्रेसचे भाई जगताप काठावर विजयी झाले. तर पाचव्या जागेवरून भाजपचे प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना धूळ चारत विजय खेचून आणला. पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड जिंकून आले आहेत. या विजयानंतर प्रसाद लाड यांनी आपल्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
प्रसाद लाड यांनी मानले फडणवीसांचे आभार
विजयानंतर आमदार प्रसाद लाड यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, आज जीवनाताला पुन्हा एकदा अविस्मरणीय क्षण आहे. सत्तेच्या राजकारणात तिसऱ्यांदा हा क्षण अनुभवायचा आनंद मिळत आहे, त्यातील 2 संधी आपल्या आशीर्वादाने व आपण केलेल्या आभाळाएवढ्या मायेमुळेच मिळाला. हे कधीच विसरता येणार नाही.
मा. @Dev_Fadnavis साहेब,
आज जीवनातला पुन्हा एकदा अविस्मरणीय क्षण आहे.
सत्तेच्या राजकारणात तिसऱ्यांदा हा क्षण अनुभवायचा आनंद मिळत आहे, त्यातील 2 संधी आपल्या आशीर्वादाने व आपण केलेल्या आभाळाएवढ्या मायेमुळेच मिळाल्या!
हे कधीच विसरता येणार नाही! pic.twitter.com/e0aFL1BDKV— Prasad Lad (@PrasadLadInd) July 8, 2022