मुंबई : Chhagan Bhujbal News : महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी (Maharashtra Sadan Scam Case) अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे. आमच्यावर खोटेनाटे आरोप लावण्यात आले आहे. मीडिया ट्रायलसुद्धा झाली. सव्वा दोनवर्षांपेक्षा जास्त काळ आम्हाला तुरुंगात राहावे लागले. एक रुपयाही आम्हाला मिळाला नाही. तरीही आरोप लावण्यात आले. हे सगळे खोटे-नाटे आरोप आहेत, असे भुजबळ म्हणाले.
- महाराष्ट्र सदन केस देशभर गाजली. फाईव्ह स्टार हॉटेलसारखे ते बांधले गेले. अंधेरीचे आरटीओ ऑफीसही सुंदर बांधले.
- त्या कंत्राटदाराला 100 कोटी एफएसआय देवू म्हटले होते करारानुसार. परंतु आतापर्यंत एक पैशाचा एफएसआय त्याला दिलेला नाही. यातून आम्ही 800 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. यातून मला व समीरला सव्वा दोन वर्षे तुरूंगात राहावे लागले
- आम्ही सत्र न्यायालयात अर्ज केला होता की आम्हाला यातून वगळण्यात यावे. यातून एक पैसा कुणाला मिळाला नाही. मला, समीर व इतर काही जणांना वगळण्यात आलंय
- त्रास द्यायचाच ठरवला होते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही
- संयमितपणे हे स्विकारत आहोत. कुणाबद्दलही द्वेष नाही. आमच्या वाटेला आले ते भोगले
- साजिशे लाखो बनती है, मेरी हस्ती मिटाने के लिए, आपकी दुवा है....
- समाधानाची झोप लागेल. पण काही लोक झोपू देणार नाहीत
- कुणाला कुठं जायचं ते जावू शकतात.
- तुरूंगात राहयला कुणाला आवडेल. केईएम रूग्णालयातील डॉक्टरांमुळं तेव्हा वाचलो.आता दु:खाचा पाढा वाचू
- तुमचा भुजबळ करू म्हणत होते. भुजबळांप्रमाणे सर्व निर्दोष ठरतील
- उलगडा होण्याची सुरूवात झालीय. ८ खटले कशासाठी टाकले,त्रास देण्यासाठीच. न्यायदेवतेवर विश्वास आहे, वेळ लागेल. जे मूळ होते ते महाराष्ट्र सदन व इतर केसेस बांधल्या गेल्या
- मी जोरात बोलतो...म्हणून गप्प करावे असे वाटले असेल
-मुख्यम़ंत्री, शरद पवार यांची भेट घेवून माहिती दिली. त्यांचे आभार मानले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर आज गुरुवारी न्यायालयाने भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.