मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक, आज घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच

रविवारी या मार्गांवर मेगाब्लॉक, कुठे आणि कोणत्या वेळेत असेल मेगाब्लॉक. पाहा कसा असेल आजचे वेळेपत्रक. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 9, 2025, 08:03 AM IST
मध्य रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉक, आज घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच  title=

मध्य रेल्वेचा 9 फेब्रुवारी रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांकरिता मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक कोणत्या स्थानकांवर आणि वेळेत असेल पाहा. 

माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक 

सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

सकाळी 11.25 ते दुपारी 3.27  वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत अप आणि डाउन हार्बर मार्गावर असणार आहे. सकाळी  ते दुपारी 11.16 ते 4.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील.

सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13  वाजेपर्यंत गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि वेस्टर्न लाईन स्टेशनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी  आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा ब्लॉक

100 वर्षांपेक्षा जुन्या पुलाचे गर्डर बदलण्याचे होणार काममुंबई: पश्चिम रेल्वेच्यामुंबई सेंट्रल आणि ग्रांटरोड स्टेशनदरम्यान असलेल्या पूल क्रमांक 5 चे जुने स्टील गर्डर बदलण्यासाठी 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल स्टेशन जवळ असलेल्या 1862 साली उभारण्यात आलेल्या जुन्या नाल्यावरील पुलाचे (कल्वर्ट) स्टीलचे गर्डर बदलून त्याजागी सिमेंट कॉंक्रिटचे (आरसीसी) गर्डर उभारण्यात येणार आहेत. या पुलावर 1964  साली स्टीलचे गर्डर उभारण्यात आले होते त्याजागी आता आरसीसी गर्डर उभारण्यात येणार आहेत. या भागातील सर्व 5 मार्गिकांवर 12 मीटर लांबीचे 24 आरसीसी स्लॅब उभारण्यात येणार आहेत. हे काम टप्प्या टप्प्याने करण्यात येणार असून मार्च महिन्यापर्यंत स्टीलचे सर्व गर्डर सिमेंटच्या स्लॅबमध्ये बदलण्यात येणार आहेत.  पश्चिम रेल्वे मार्गावर असे आणखी 100 वर्षांपेक्षा अधिक जुने 3 पूल असून त्यांचे देखील स्टीलचे गर्डर देखील बदलण्यात येणार आहेत. असा असेल ब्लॉक आणि त्याचे परिणाम 

या पुलांचे स्टील गर्डर बदलणार 

पश्चिम रेल्वे मार्गावर 100 वर्षांपेक्षा जुने अंधेरी पूल क्रमांक 40, खार सबवे पूल क्रमांक 31 आणि बोरिवली पूल क्रमांक 61 हे 3पूल असून त्यांचे देखील गार्डर 2025 च्या अखेरपर्यंत बदलण्याचे नियोजित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.