CCTV: मुंबईत तरुणीसोबत लोकलमध्ये काय घडलं पाहा, यांना चाप लावणार कोण?

तरुणीसोबत लोकलमध्ये घडली अतिशय वाईट घटना, (व्हीडीओ पाहा) खरोखर मुंबईला महिलांसाठी सुरक्षित म्हणायचं का?

Updated: Mar 12, 2022, 03:39 PM IST
CCTV: मुंबईत तरुणीसोबत लोकलमध्ये काय घडलं पाहा, यांना चाप लावणार कोण? title=

मुंबई : मुंबईत (Mumbai) रात्रीच्या वेळी लोकलने (Mumbai Local) प्रवास करणं महिलांसाठी किती सुरक्षित आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) चर्निरोड स्थानकात (Charni Road Railway Station) एका तरुणीवर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ही घटना काल रात्री बाराच्या दरम्यान घडली असल्याची माहिती मिळतेय. चर्चगेट स्थानकावरुन एक तरुणी रात्रीच्यावेळी लोकलने प्रवास करत होती. लोकल चर्नीरोड स्थानकात आल्यावर एक तरुण महिलांच्या डब्यात घुसला. त्याने या तरुणीवर हल्ला केला. आपल्याकडे असलेल्या ब्लेडने त्याने या तरुणीच्या गळ्यावर वार केला. 

या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती आला असून आरोपी लोकलमधून उतरताना दिसत आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आरोपीने थेट महिलांच्या डब्यात घुसून तरुणीवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.