Mumbai Corona Update | कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, दिवसभरात किती जण पॉझिटिव्ह?

राज्यासह शहरात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.   

Updated: Jan 20, 2022, 08:08 PM IST
Mumbai Corona Update | कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, दिवसभरात किती जण पॉझिटिव्ह? title=

मुंबई : राज्यासह शहरात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे राज्यात काही निर्बंध लावण्यात आले. दररोज मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली. मात्र आता मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. सातत्यान वाढणाऱ्या दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येला आता ब्रेक लागयला सुरुवात झाली आहे, असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. (mumbai corona update 20 january 2022 today 5 thousand 708 corona patients and 12 deaths in city)

मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 708 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज दिवसभरात एकूण 15 हजार 440 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका झाला आहे. तर कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर हा 84 दिवसांवर जाऊन ठेपला आहे. 

लवकरच निर्बंध हटणार? 

मुंबईतील कोरोनाचा दररोज घटणारा आकडा पाहता लवकरच निर्बंध शिथिल होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.   

मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी

1 जानेवारी -  6 हजार 347

2 जानेवारी -  8 हजार 063

3 जानेवारी -  8 हजार 082

4 जानेवारी - 10 हजार 860

5 जानेवारी - 15 हजार 166 

6 जानेवारी - 20 हजार 181

7 जानेवारी- 20 हजार 971

8 जानेवारी- 20 हजार 318

9 जानेवारी - 19 हजार 474

10 जानेवारी - 13 हजार 648

11 जानेवारी - 11 हजार 647

12 जानेवारी - 16 हजार 420 

13 जानेवारी - 13 हजार 702

14 जानेवारी - 11 हजार 317 

15 जानेवारी - 10 हजार 661 

16 जानेवारी - 7 हजार 895

17 जानेवारी - 5 हजार 956

18 जानेवारी - 6 हजार 149 

19 जानेवारी - 6 हजार 32

20 जानेवारी - 5 हजार 708