मुंबई : सध्या कॉवीड - 19 आणि लॉकडाउनच्या पाश्वभूमीवर निर्माण झालेल्या परस्थितीमुळे एचआईव्हीसह जीवन जगत असलेल्या व्यक्तींसाठी ही महत्वाची बातमी आहे. अशा व्यक्तींना अत्यावश्यक अशी ART (अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट) औषधे मिळणं गरजेचे असते. ही औषधे त्यांच्या नेहमीच्या ART केंद्रावर मिळतात. पण सध्या लॉकडाऊमुळे ही औषधं मिळणं कठीणं झालं आहे.
वेळेवर औषधे न मिळाल्यामुळे अशा व्यक्तींच्या उपचारामध्ये खंड पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे एचआईव्ही संसर्गित रुग्णांमध्ये कोवीड 19 आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका अधिक असतो.
यावर उपाय म्हणून मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारे एचआईव्ही बाधित रुग्णांना ART उपचार त्यांच्या जवळच्या सरकारी अथवा महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.
तसेच त्यांना फोनवरून नजीकच्या रुग्णालयाची माहिती आणि हा प्रवास शक्य नसल्यास वस्तीपातळीवरील औषधवाटपा संबधी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तरीही जवळच्या ART केंद्राविषयी किंवा संबंधित इतर कुठल्याही माहितीसाठी ' ARTmitr - ०२२ - ४८९७२३०५' या विशेष हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा असे आवाहन मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेने केले आहे.