मुंबई : देशभरात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजीनचा अभाव निर्माण झाला आहे आणि ऑक्सिजन अभावी अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. अशात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. वातावरणतील घटक वापरुन आता ऑक्सिजनची निर्मिती करणे शक्य झाले आहे. त्यामुळे लवकरच ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार असल्याचे समोर येत आहे.
देशभरात ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा पाहता आयआयटी मुंबई प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी आपल्या पायलट प्रोजेक्ट मधून PSA ( pressure swing adsorption ) नायट्रोजन युनिटचे रूपांतर PSA ऑक्सिजन युनिटमध्ये केले आहे.
देशभरातील इंडस्ट्रीयल प्लांट मधील नायट्रोजन प्लांट हा वातावरणतील हवा वापरून ऑक्सिजनची निर्मिती करु शकतो. त्यामुळे या प्लांट अंतर्गत मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता असल्याच या संशोधनातून समोर येत आहे
ऑक्सिजनची मागणी पहाता मुंबई आयआयटी, टाटा कँस्लिटिंग इंजिनीरिंग, स्पॅनटेक इंजिनीरिंग यांच्यात सामंजस्य करार ( MoU) साइन झाल्यानंतर अशाप्रकारचा अभ्यास ऑक्सिजन निर्मिती संदर्भताल समोर आला आहे. हा सगळा प्रोजेक्ट तीन दिवसात सेट अप करण्यात आला असून या प्रात्यक्षिकतून 3.5 प्रेशर खाली 93-96 % शुद्धता असलेला ऑक्सिजन निर्माण करण्यात येऊ शकतो हे समोर आले आहे.
त्यामुळे आता या ऑक्सिजनचा उपयोग कोविड रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो.