मुंबई : बातमी आहे मुंबईची लाईफ लाईन लोकल रेल्वेसंदर्भात (mumbai suburban railway) आणि मुंबईकरांना दिलासा देणारी. तब्बल 2 वर्षांच्या खंडानंतर अखेर यूटीएस अॅप (Universal Ticket System) प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यूटीएस अॅप सुरु झाल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना ऑनलाईन तिकीट (Onlibe Railway Ticket) काढता येणार आहे. उद्यापासून अर्थात 24 नोव्हेंबरपासून ऑनलाईन तिकीट मिळणार आहे. (Mumbai Local Mobile Ticket App Universal Ticket System is resume for the public from tomorrow 24th November 2021)
वेळ आणि तिकीट खिडकीवरील खोळंबा टळणार
तिकीट खिडकीवर भली मोठी रांग असते. मात्र आता यूटीएस अॅप सुरु झाल्याने प्रवाशांचा महत्तवपूर्ण वेळही वाचणार आहे. तसेच तिकीट खिडकीवर होणारा खोळंबाही टळणार आहे.
ऑनलाईन तिकीट सर्वांना मिळणार का?
सध्या कोरोना लसीच्या 2 डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्यांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी आहे. यूटीएस अॅप सुरु होत असल्याने ऑनलाईन तिकीट हे सर्वांना मिळणार की लसवंतांनाच, असा सवाल केला जात आहे. मात्र ऑनलाईन तिकीट मिळवण्यासाठीही पूर्णपणे लसवंत असणं बंधनकारक असणार आहे.
प्रवाशी लसवंत आहे की नाही कस कळणार?
कोरोनानंतर राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास यंत्रणा सुरु केली. कोरोना लसीच्या 2 डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्यांनाच हे युनिव्हर्सल पास मिळतं. यामुळे बनावट पासने प्रवास करणाऱ्यांना आळा बसला. मात्र आता यूटीएस अॅप सुरु झाल्याने प्रवासी पूर्ण लसवतं आहे की नाही हे देखील समजणार आहे.
यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणालीसाठी राज्य सरकारच्या युनिव्हर्सल तिकीटिंग अॅपला यूटीएस लिंक केलं गेलं आहे. त्यामुळे प्रवाशानं दोन डोस घेतले आहेत की नाही, हे परस्पर समजणार असल्यानं दरवेळी युनिव्हर्सल पास दाखवण्याची कटकट टळणार आहे.