Pani puri priced at Mumbai airport : भारतातल्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी (Street Food) पाणीपुरी हा सर्वात आवडता खाद्यपदार्थ आहे. पाणीपुरी (Pani Puri) आवडत नाही अशी व्यक्ती कदाचित सापडेल. तिखट-गोड स्वाद असलेल्या पाणीपुरीच्या एक प्लेटची किमत साधारण 25 ते 50 रुपयांदरम्यान आहे. मराठीत याला पाणीपुरी तर हिंदी भाषेत गोलगप्पे असं म्हटलं जातं. लोकांच्या आवड लक्षात घेऊन फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्येही पाणीपुरीने जागा पटकावली आहे. आता तर मुंबई विमानतळावरच्या (Mumbai Airport) फूड स्टॉलवरीह पाणीपुरी मिळू लागली आहे. पण एका प्लेटची किंमत ऐकून ठसका आल्याशिवाय राहाणार नाही.
मुंबई विमानतळारची महागडी पाणीपुरी
मुंबई विमानतळावरच्या फूड स्टॉलवर पाणीपुरीची किंमत ऐकून लोकं हैराण झाले आहेत. इथं एक प्लेट पाणीपुरी खाण्यासाठी तुम्हाला तब्बल 333 रुपये मोजावे लागतायत. सोशल मीडियावरच्या एक्स हँडलवर @kaushikmkj नावाच्या एक युजरने मुंबई विमानतळावरच्या पाणीपुरीचा किंमत असलेला फोटो शेअर केला आहे. या पोस्टने नेटिझन्सचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत पाणीपुरीच्या स्टॉलवर 333 रुपयांचं प्राईज टॅग लावण्यात आलं आहे.
एका पाणीपुरीची किंमत 55 रुपये
विमानतळावर खाद्यपदार्थांच्या किंमतीवर बराचवेळा नेटिझन्सकडून टीका केली जाते. काही युजर्सने 333 रुपयांची पाणीपुरी खरच कोणी खात असेल का असा प्रश्न विचारला आहे. तर महागड्या खाद्यपदार्थांसाठी विमानतळ व्यवस्थापन नाही तर त्यावर लागणारे कर जबाबदार असल्याचं म्हटलंय. एका युजरने म्हटलंय एक प्लेट 333 रुपये म्हणजे एक पाणीपुरी 55 रुपयांना. एका पाणीपुरीच्या किंमतीत मुंबईच्या रस्त्यावर एक पूर्ण प्लेट मिळते अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
Real estate is expensive for food stalls at the CSIA Mumbai airport - but I didn’t know THIS expensive pic.twitter.com/JRFMw3unLu
— Kaushik Mukherjee (@kaushikmkj) April 29, 2024
ही पोस्ट आतापर्यंत 41 हजार वेळा पाहिली गेली आहेत. वास्तविक विमानतळावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत विमानतळ मेन्टेन टॅक्स, युटीलिटी बिल, कर्मचाऱ्याचा पगार असा सर्व टॅक्स लावलेला असतो. पाणीपुरीची प्लेट 333 रुपयांना मिळत असली तरी दुकानदाराच्या हाती केवळ 33 रुपयांची कमाई पडते. 50 हजार रुपयांचं विमानाचं तिकिट खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पाणीपुरीसाठी 333 रुपये काहीच नाहीत, अशा प्रतिक्रियाही या पोस्टवर येत आहेत.
विमानतळ किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केवळ पाणीपुरीच नाही तर पाण्याची बाटली, एक कप चहा, इडली, मेदू वडा प्लेटची किंमतही जास्त असते.