रेल्वेने उडवले भाषेचे धिंदवडे, भाषांतराची केली गळचेपी

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पूलांवर स्लोगन चिटकवून मार्गदर्शनाचे काम हाती घेतले खरे. मात्र 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 21, 2017, 05:25 PM IST
रेल्वेने उडवले भाषेचे धिंदवडे, भाषांतराची केली गळचेपी  title=

मुंबई : एल्फिस्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पूलांवर स्लोगन चिटकवून मार्गदर्शनाचे काम हाती घेतले खरे. मात्र 

या कारभारात रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. रेल्वे प्रशासनाने मराठी भाषेचे धिंदवडे उडवल्याचे चित्र समोर आले आहे. २९ सप्टेंबर रोजी एल्फिस्टन दुर्घटना घडली यामध्ये २२ लोकांनी विनाकारण आपले जीव गमावले. 

या दुर्घटनेनंतर एल्फिस्टनवर नवीन पूल बांधण्याची जबाबदारी आर्मीकडे देण्यात आली. आणि इतर रेल्वे स्टेशनवर अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून वेगवेगळे उपाय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आले. यामध्ये रेल्वे पूलाच्या पायऱ्यांवर मार्गदर्शन करणारे वेगवेगळे फलक लावण्यात आले. मात्र त्यामधून प्रशासनाला मराठी भाषेचं असलेलं ज्ञान समोर आलं आहे. 

रेल्वे प्रशासनाने 'कृपया लहान चेंडू घेऊ नका' असं एक स्टिकर लावण्यात आलं आहे. या स्टिकरचा अर्थ काय? हा प्रश्न साऱ्या प्रवाशांना पडला आहे. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांना सुचित करायचं आहे की, Please do not take short cuts पण यासाठी त्यांनी जे मराठी भाषांतर केले आहे. ते हास्यास्पद असून प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणणारे आहे. 

तसेच दुसऱ्या फोटोत आपल्याला 'कृपया हँड्राईल धरून ठेवा' असं स्टिकर दिसत. मात्र यातून रेल्वे प्रशासनाला नक्की काय सांगायचं? हेच कळत नाही. वेस्टर्न रेल्वेच्या सांताक्रुझ रेल्वे स्टेशनवर हे स्टिकर लावण्यात आले आहेत.