तिन्ही रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक

  दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

Updated: Jan 7, 2018, 08:13 AM IST
तिन्ही रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक   title=

मुंबई  :  दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय.. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

मध्य रेल्वेवर मुलुंड ते मांटुगा स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही स्लो मार्गांवर ब्लॉक घेण्यात आलाय..

मध्य रेल्वेवर मुलुंड ते मांटुगा स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०पर्यंत ब्लॉक असेल.. हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल

 पश्चीम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलमध्ये अप आणि डाउन स्लो मार्गावर सकाळी १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.. या कालावधीत अप आणि डाऊन स्लोवरील लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रलमध्ये अप आणि डाऊन फास्ट मार्गावर चालतील. तर काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत..