Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' परिसरात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

Mumbai Water Cut news : उन्हाचा वाढती छळा त्यात आता पाणीचं संकट...यामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. पुन्हा एकदा मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलंय. 

नेहा चौधरी | Updated: May 12, 2023, 09:41 AM IST
Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' परिसरात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद title=
mumbai water supply in kurla will be shut off next three consecutive saturday 13 may Mumbai Water Cut news

Mumbai water supply News : राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम असताना. दुसरीकडे उन्हाचा झळाही सोसाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी तापमानाने चाळिशीचा आकडा पार केला आहे. मुंबईकरही उन्हामुळे त्रस्त आहे. अशातच मुंबईकरांवरील पाणी संकट ओढवलं आहे. मुंबईतील कुर्ल्या परिसरात पाणीकपात करण्यात येणार आहे. (mumbai water supply in kurla will be shut off  next three consecutive saturday 13 may Mumbai Water Cut news)

कधी असणार पाणीकपात?

कुर्ला परिसरात सलग तीन शनिवार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या म्हणजे  13 मे 2023 शनिवारी आणि त्यानंतर 20 आणि 27 मे ला पाणीपुरवठा बंद राहणार आहेत.  पालिका प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

कुर्ल्यातील कुठल्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

कुर्ल्यातील ‘एल पूर्व’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णीवाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मीनारायण रोड, जोश नगर, आजाद मार्पेट या भागात पाणीपुरवठा बंद सलग तीन शनिवार बंद राहणार आहे. 

'या' कामासाठी राहणार बंद 

पालिकेकडून उप जल अभियंता विभागाकडून खैरानी रोडवरील जलवाहिनीचं काम हाती घेण्यात आलं आहे.  खैरानी रोडवरील जमिनीखालील 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे तुकाराम ब्रिज ते जंगलेश्वर महादेव मंदिर यादरम्यान पुनर्वसन आणि मजबुतीकरणाचं काम करण्यात येणार आहे. काम दर शुक्रवारी दुपारी 1  वाजल्यापासून रविवार पहाटे 5 वाजेपर्यंत हे काम होणार आहे. 

नागरिकांनी काळजी घ्यावी!

रविवारी पाणीपुरवठा नियमित झाल्यानंत परिसरातील सर्व नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचा सल्ला विभागाने दिला आहे. 

या ठिकाणीही पाणी पुरवठा राहणार बंद  (Thane, Navi Mumbai and Mira Bhayander)

ठाणे, नवी मुंबई आणि मिरा भाईंदरमध्ये आज 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकार महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर या पालिकांसह वागळे इस्टेट आणि नवी मुंबईतील टीटीसी औद्योगित क्षेत्रात पाण्याची समस्या जाणवणार आहे.  या परिसरातील औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर रहिवाशांनाही पाणी नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. आज दुपारी 12 जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार आहे. एमआयडीसी पाणी वितरण व्यवस्थेतील अनेक जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यासाठी विभागाने नव्या वाहिन्या टाकण्याचं काम हाती घेतलं आहे. 

या कामाला जास्त जास्त वेळ लागणार असल्याने शुक्रवारी (१२ मे २०२३) ला चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी 13 मे 2023 ला दुपारी 12 वाजता पाणी पूर्ववत होईल असं सांगण्यात आलं आहे.