मुंबई : मुंबईतल्या वरळी नाक्यावरच्या गोपचर बिल्डींगच्या वतीनं गेल्या २७ वर्षांपासून वर्षाअखेरीस बॅडमॅनचं दहन केलं जातं. यंदा देशातील वाढती बेरोजगारी ही थीम वापरून केंद्र सरकारनं रोजगार वाढीसाठी विशेष धोरण राबवण्याची मागणी पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री या बॅडमॅनचं दहन केलं जाणार आहे.
यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी....