अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण; राज्य सरकारचा निर्णय

अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Updated: Jan 17, 2018, 05:03 PM IST
अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण; राज्य सरकारचा निर्णय title=

मुंबई : अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अनाथाश्रमात वाढलेल्या मुलांना शिक्षण, नोकरीत अडचण येतात. याबाबत झी मीडियाने आवाज उचलला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी शासकीय नोकरीतील अर्जावर अनाथ हा कॉलम असणार आहे. शासकीय नोकरीसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. या निर्णयामुळे झी मीडियाच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे.
 
सरकारनं हा निर्णय घेऊन मुख्य प्रवाहात आणलंय. त्यामुळे अनाथाश्रमाचे संचालक सागर रेड्डी यांनी सरकार आणि झी मीडियाचे आभार मानले आहेत.