Palghar Crime : पालघरमध्ये दुहेरी हत्याखंडाने खळबळ उडाली आहे. पालघर तालुक्यातील एकाने दोन जेष्ठ नागरिकांचा हल्ला करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपी हा जवळच्या दलदलीत जाऊन लपला होता. दोघांची हत्या करणारा आरोपी हा मानसिक रुग्ण असल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
पालघर तालुक्यातील बोईसर जवळील कुडण येथे दोन जेष्ठ नागरिकांचा हल्ला करून खून करण्यात आला. ही घटना रात्री 9 वाजल्याच्या सुमारास घडली. हत्या झालेले दोन्ही व्यक्ती हे भाऊ होते अशीही माहिती पुढे येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हत्याकांडानंतर आरोपीचा स्थानिक आणि पोलीस शोध घेत होते. त्यानंतर आरोपीला करण खाडीमधील पाण्यातून पकडण्यात आलं. महत्त्वाची बाब म्हणजे हत्या करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे म्हटलं जात आहे. आरोपी हा गेल्या दोन दिवसांपासून गावात फिरत होता. हत्येनंतर आरोपी झुडपातून पसार झाला होता.
मोठीं कुडन इथल्या भिवराव आणि मुकुंद पाटील यांचा धारदार शस्त्राने खून केल्यानंतर आरोपीने बाजूला राहणाऱ्या घरांवरही हल्ला केला होता. त्यावेळी रुपेश पाटील नावाच्या व्यक्तीने आरोपीच्या हातातील कुदळ खेचून घेतली. त्यानंतर आरोपी गावाच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेतून पळून गेला आणि करण खाडीतील दलदलीत जाऊन लपला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध सुरु केला. बऱ्याच तपासानंतर पोलिसांनी आरोपीला तलावातून बाहेर काढलंय. सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
#WATCH | Palghar, Maharashtra: Police arrested the double-murder accused Kishor Kumar Mandal from a nearby mud pond. https://t.co/kL8xEDjd7h pic.twitter.com/TxBiwMOHWr
— ANI (@ANI) March 1, 2024
दरम्यान, पोलिसांनी तलावात बरीच शोधाशोध केल्यानंतर आरोपी हा दलदलीत लपल्याचे समोर आलं. पोलिसांनी जबरदस्तीने आरोपीला खेचून बाहेर काढलं आणि अटक केली आहे. आरोपी हा मानसिक रुग्ण आहे की आहे नाही हे वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटलं आहे.