मुंबई : 'जनआक्रोश' आंदोलन रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी भाजप आमदार राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी 'जनआक्रोश' आंदोलनआयोजित केलं होतं. त्या अगोदरच पोलिसांनी राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच राम कदम यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं आहे.
Maharashtra: BJP MLA Ram Kadam and his supporters detained by Police from outside his residence in Mumbai. They were taking out a 'Jan aakrosh yatra' to Palghar demanding CBI probe into Palghar mob lynching case. pic.twitter.com/rYUxFKOV71
— ANI (@ANI) November 18, 2020
पालघर साधू हत्या प्रकरणी आक्रोश यात्रा काढणार होते. पण त्याअगोदरच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. राम कदम यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
हमे पालघर जाने से महाराष्ट्र सरकार रोक रही है किस किस आवाज दबोचने की कोशिश करोगे? #palgharsadhulynching
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) November 18, 2020
महाराष्ट्र सरकार आपल्याला पालघरला जाण्यापासून रोखत आहेत. कुणाकुणाचा आवाज दाबणार तुम्ही? असा सवाल देखील केला आहे.