मुंबई : शिवसेनेनं महागाईविरोधात केलेल्या आंदोलनाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केलंय. मात्र त्याचवेळी शिवसेनेला चिमटे घेत सत्तेतून बाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष सल्लादेखील दिलाय.
ट्विटरवरुन त्यांनी शिवसेनेचं कौतुक केलंय. शिवसेनेने महागाईच्या विरोधात केलेले आंदोलन अभिनंदनीय आहे. मात्र सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही. सत्तेत राहून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा किंवा पूर्णपणे रस्त्यावर तरी उतरावे, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय.
वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेने शनिवारी मुंबईत 12 ठिकाणी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केलं होत. या मोर्चात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेने महागाईच्या विरोधात केलेले आंदोलन अभिनंदनीय आहे. मात्र सत्तेत राहून अशी भूमिका घेणे बरे नाही.
(१/२)— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 24, 2017
सत्तेत राहून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा किंवा पूर्णपणे रस्त्यावर तरी उतरावे.
(२/२)— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 24, 2017