मुंबई : बेस्टच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबईत काही उपाययोजना केल्यात. स्कूल बस, कंपनी बस आणि मालवाहू वाहनांतूनही प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलीये.
दुसरीकडे एमएसआरटीसीकडूनही काही बस चालवल्या जाणार आहेत. तसंच रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनाही जास्तीत जास्त वाहनं रस्त्यावर उतरवण्याची सुचना राज्य सरकारनं केली आहे.
बेस्ट संपाची झळ बसू नये, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारनं या उपाययोजना केल्यात.