भीमा प्रकरणातील आरोपी परेरा ठाण्यात परतला

 परेरासह पाच जणांना पुणे पोलीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केली.

Updated: Aug 30, 2018, 09:04 AM IST

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अरुण परेरा आपल्या राहत्या घरी ठाण्यातील चरई भागातील शीनोय इमारतीत परतलाय. पहिल्यांदा नौपाडा पोलिस ठाण्यात जाऊन हजेरी लावली नंतर त्याला पुणे गुन्हे शाखां पोलिसांनी घरी नेले. परेरासह पाच जणांना  पुणे पोलीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी अटक केली.

आरोपी नजर कैदेत 

 त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीत सर्व पाचही आरोपींना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आलंय. त्यानुसार अरुण परेराला ठाण्यात आणण्यात आलंय.