वाहतूकदारांच्या संपामुळे मुंबईत बटाट्याचा तुटवडा

किरकोळ बाजारात बटाटा तब्बल ८ ते १० रूपयांनी महागला आहे.

Updated: Jul 23, 2018, 06:47 PM IST
वाहतूकदारांच्या संपामुळे मुंबईत बटाट्याचा तुटवडा title=

मुंबई: वाहतूकदारांच्या संपाचा चौथा दिवस आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून येणाऱ्या बटाट्यावर याचा थोडाफार परिणाम दिसतोय. बटाट्याची आवक ४० टक्के कमी झालीय. बटाट्याचे भाव घाऊक बाजारात तीन ते चार रूपयांनी वाढलेत. त्यामुळे किरकोळ बाजारात बटाटा तब्बल ८ ते १० रूपयांनी महागला आहे. 

वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या ६३५ गाड्यांची आवक झाली. कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या १३० तर बटाट्याच्या ४८ गाड्या दाखल झाल्या आहेत. दररोज ही संख्या ७५ ते ८०च्या घरात असते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून येणारा बटाटा घटलाय. सध्या केवळ गुजरातमधून बटाटा येतोय. मात्र, राज्यातून होणारी भाजीपाल्याची आवक सुरळीत आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळांचे दर जैसे थे राहण्यास मदत होत आहे.