Mumbai Rain: दमटपणा आणि उष्णतेने त्रस्त मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईपाठोपाठ मुंबईच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरु झालाय. उपनगर आणि शहराच्या काही भागात पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास चांगला पाऊस झालाय. आज मुंबईतील वातावरण ढगाळ असणार असून काही ठिकाणी पाऊस बरसणार आहे. तर मुंबईकरांनी छत्री घेऊन घराबाहेर पडावं.
Live update - Expect a few passing showers during morning hours today in Mumbai. Lots of patchy rain bands present over Mumbai gave light/moderate rains overnight in Mumbai, likely to stay the same for next few hours.
Comment if it starts raining in your area #MumbaiRains https://t.co/78VYozkaP5 pic.twitter.com/b7o0BJukWv— Mumbai Rains (@rushikesh_agre_) June 6, 2024
हवामान विभाग आणि बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायनमध्ये सर्वाधिक 33 मिमी, दादरमध्ये 29 मिमी, वडाळ्यामध्ये 27 मिमी, ओशिवरामध्ये 26 मिमी, चेंबूरमध्ये 20 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय. याशिवाय अंधेरीमध्ये 12 मिमी, जुहूत 9 मिमी, कांदिवली अग्निशमन केंद्रात 9 मिमी, घाटकोपर आणि बीकेसीमध्ये 5 मिमी, तर मागाठाणेमध्ये 2 मिमी पाऊस बरसलाय. मुंबईच्या इतर भागातील लोक अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.