विकेंड लॉकडाऊनबाबत कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नियमावली जारी; वाचा सविस्तर

 कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे. 

Updated: Apr 9, 2021, 03:57 PM IST
विकेंड लॉकडाऊनबाबत कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नियमावली जारी; वाचा सविस्तर title=

कल्याण : वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात काय सुरू राहणार याची माहिती दिली आहे. 
 
 कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचे थैमान झाले असून रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. महापालिका प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शक्य ते प्रयत्न करीत आहेत.

 राज्य शासनाने शनिवार आणि रविवारी दोन दिवस आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत.  या दोन्ही दिवसांत परीक्षार्थी विद्यार्थी, ऑनलाईन फूड होम डिलीव्हरी, भाजीपाला, चिकन -मटण-मासे विक्रेते, वाईन शॉपबाबत असणाऱ्या निर्बंधांबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली. 
 
 तर अनेक मद्यप्रेमींच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा असणारे वाईन शॉप 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच कल्याण डोंबिवलीतील सध्याची कोवीड रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी शनिवारी - रविवारी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.   

शनिवार -रविवारबाबत या आहेत सूचना...

ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी कोणताही अडथळा असणार नाही. हॉल तिकीट दाखवून प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर एका प्रवाशाला परवानगी देण्यात आली आहे. 

ऑनलाईन डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो, स्विगी आदींना 24 तास होम डिलिव्हरीसाठी परवानगी...

अत्यावश्यक किराणा, दूध, भाजीपाला, फळविक्रेते, मिठाई यांची दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहतील.

मटण-चिकन-अंडी-मासे विक्री दुकाने आठवडाभर नियमांचे पालन करत सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहणार..

भाजीपाला विक्रेते 6 फूट अंतर ठेऊन आणि वर्तुळ काढून विक्री करणार...

औषध दुकाने हॉस्पिटल वेळेचे बंधन नाही..

पीठ गिरणी आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत सुरू राहणार.

आईस्क्रीम, ज्यूस, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रस्त्याच्या कडेचे स्टॉलला फक्त पार्सल विक्रीस परवानगी. होम डिलिव्हरी करणार असेल तरच सुरू अन्यथा बंद ठेवायचे..

इतर सूचना...

वाईन शॉप 30 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंदच असणार.

चष्मे दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 सुरू ठेवण्यास परवानगी

चार्टर्ड अकाऊंटस् ऑफिसेस सोमवार ते शुक्रवार सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत परवानगी...