'४० मिनीटं भाषण करताना पंकजांना चक्कर कशी आली नाही'

त्या सभेत पंकजा मुंडे या तब्बल ४० मिनिटे बोलल्या. यावेळी त्यांनी भावनिक भाषण केले होते.

Updated: Oct 21, 2019, 04:28 PM IST
'४० मिनीटं भाषण करताना पंकजांना चक्कर कशी आली नाही' title=

मुंबई: परळीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात रंगलेल्या वादावर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभेच्या व्यासपीठावर पंकजा चक्कर येऊन कोसळल्या होत्या. त्या सभेत पंकजा मुंडे या तब्बल ४० मिनिटे बोलल्या. यावेळी त्यांनी भावनिक भाषण केले होते. मात्र, त्यावेळी पंकजा यांना काहीही झाले नाही. शेवटी शेवटी अचानक त्यांना चक्कर कशी आली, असा सवाल शरद पवार यांनी विचारला. 

तसेच धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना 'बहिणाबाई' म्हणण्यात काय गैर आहे, असेही पवारांनी विचारले. बहिणाबाई या मोठ्या कवियत्री होत्या. त्यामुळे हा शब्द आदरणीय आहे. त्यामुळे धनंजय यांनी पंकजांना बहिणाबाई म्हणण्यात काहीही गैर आहे, असे मला वाटत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

धनंजयने निवडणूक इतक्या खालच्या स्तराला नेऊ नये- पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांना चक्कर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. यानंतर महिला आयोगानेही पुढाकार घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. मात्र, महिला आयोगाची ही भूमिका पक्षपाती असल्याचे पवारांनी म्हटले. महिला आयोगावर सामान्यपणे सत्ताधारी पक्षाचे लोक असतात. पण आपण भाजपचे प्रतिनिधी म्हणून बसतो हे दाखवायलाच पाहिजे असे काही नाही, असा टोला पवारांनी लगावला. 

परळीच्या सभेत पंकजा मुंडेंना चक्कर; व्यासपीठावरच कोसळल्या

धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर या भावाबहिणीमध्ये नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हे प्रकरण गुन्हा दाखल होण्यापर्यंत पोहोचले आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे यामुळे परळीतील राजकारणाला रंगत आली आहे.