मुंबई : ट्विटरवरती जोरदार ट्वीट नाट्य सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर मिळत आहेत. शिवसेनेचे युवा नेता वरूण सरदेसाईंनी यांनी बोचरी टीका केली आहे. अमृता फडणवीसांच्या 'त्या' ट्वीटला वरूण सरदेसाईने प्रत्युत्तर दिलं आहे. कालपासून हे ट्वीट नाट्य सुरू आहे.
शिवसेनेचे युवा नेता वरूण सरदेसाईंनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला रिट्वीट करून 'मराठी बिग बॉसचे ऑडिशन कुठे सुरू आहेत का? विचारले आहे. तसेच माजी झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल सारख्या गाण्याच्या कार्यक्रमालाही बोलवणार नसल्याचं म्हटलं आहे. बाकी बिग बॉससाठी चालू देत जोरदार...' अशी बोचरी टीका केली आहे. ('सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथ पेशव्यांची बुद्धी भ्रष्ट केली')
मराठी बिग बॉस चे ऑडिशन वगैरे सुरु आहेत काय? 'माजी' झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल ला उभं पण करणार नाही. बाकी बिग बॉस साठी चालू देत जोरदार.. https://t.co/mSEIPXGUAJ
— Varun Sardesai (@SardesaiVarun) December 22, 2019
वरूण सरदेसाईंनी या ट्विटला उत्तर देताना बिग बॉससारख्या रिऍलिटी शोचा उल्लेख केला आहे. त्या शोमध्ये टिकून राहण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काही ना काही विधान करावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे अमृता फडणवीसांचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं गेलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीस यांना बरेच ठिकाणाहून गाण्याच्या कार्यक्रमांच निमंत्रण यायचे तसेच त्यांनी त्या काळात अनेक अल्बममध्ये आणि सिनेमांमध्ये गाणं गायलं आहे. याचा देखील उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला आहे. ('फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही')
या अगोदर शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी देखील ट्विट केलं होतं. 'सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली', अशा शब्दांमध्ये अमेय घोले यांनी अमृता फडणवीसांना घणाघाणी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!' एवढंच नाही तर अमृता फडणवीस यांच्यासाठी #आजच्याआनंदीबाई असा हॅशटॅग देखील वापरला आहे.