मुंबई : फेरेरे पूल पाडकामासाठी पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक शनिवारी रात्री घेण्यात येणार आहे. त्यामुळे १० वाजता शेवटची विरार लोकल असणार आहे. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल लोकल सेवा बंद राहणार आहे. हा विशेष ब्लॉक चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान शनिवारी आठ तासांचा विशेष रात्रकालीन ब्लॉक पश्चिम रेल्वे घेणार आहे. या ब्लॉकमुळे चर्चगेटहून शेवटची विरार जलद लोकल रात्री १० वाजता सूटेल, तर धीम्या मार्गावरील शेवटची बोरिवली लोकल रात्री ९.५१ मिनिटांनी चर्चगेटवरुन रवाना होईल. दरम्यान, ब्लॉकमुळे १३६ लोकल मुंबई सेंट्रल स्थानकातूनच चालवण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.
#BreakingNews । पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक । शनिवारी रात्री १० वाजता शेवटची विरार लोकल-चर्चगेट ते मुंबई सेंट्रल लोकल सेवा बंद । ८ तासांचा ब्लॉक, या ब्लॉकमुळे चर्चगेटहून शेवटची विरार जलद लोकल रात्री १० वा. तर धीम्या मार्गावरील शेवटची बोरिवली लोकल रात्री ९.५१ ला चर्चगेटवरुन सुटेल pic.twitter.com/zGxbPMBFix
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 7, 2020
पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक शनिवारी रात्री असल्याने या मार्गावरुन रात्री उशीरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना शनिवारी कार्यलयातून लवकर बाहेर पडावे लागणार आहे. फेरेरे पूल पाडकामासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान शनिवार रात्री १०.१५ ते रविवार पहाटे ६.१५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ब्लॉकमुळे १३६ लोकल मुंबई सेंट्रल स्थानकातूनच चालवण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.
चर्नी रोड ते ग्रॅंट रोड दरम्यान १९२१ साली फेरेरे पूलाची उभारणी करण्यात आली होती. गोखले पूलानंतर केलेल्या पाहणीत हा पूल धोकादायक ठरवण्यात आल्याने हा पूल पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्ने घेतला. गोखले पूलाच्या दुर्घटनेनंतर आयआयटीने केलेल्या पूलांच्या पाहणीत फेरेर पूल धोकादायक ठरवण्यात आला होता. तसेच या पूलाची नव्याने उभारणी करण्याची शिफारस ही करण्यात आली होती.
चर्चगेट -विरार (जलद) : १०.०१
चर्चगेट-बोरिवली (धीमी) : ९.५१
बोरिवली-चर्चगेट : ९.०३ विरार-चर्चगेट : १०.५१ या लोकल रद्द
रात्री ९.३२ गोरेगाव-चर्चगेट (शनिवार)
रात्री १२.३१ चर्चगेट-अंधेरी (मध्यरात्र, शनिवार-रविवार)
पहाटे ५.५९ चर्चगेट-गोरेगाव (रविवार)
पहाटे ७.०५ गोरेगाव-चर्चगेट (रविवार)