मुंबई : एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळ बैठकित दरवाढीचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. आता महानगर वाहतुक प्राधिकरण दरवाढीवर शिक्कामोर्तब करणार आहे. त्याचबरोबरच एसटी महामंडळाने राज्य सरकारला डिझेलवरील कर माफ करण्याची विनंती केली. जर करमाफी दिली तरच ही दरवाढ टळू शकणार आहे.
एसटीकडून जवळपास तीन हजार कोटींचे डिझेल खरेदी केले जाते. जर कर माफी केली २०० ते हजार कोटींचा खर्च वाचू शकणार आहे. दुसरीकडे इंधनाच्या दरवाढीमुळे देखील एसटी महामंडळाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. ही भाडेवाढ झाली तर याचा फटका एसटीच्या सुमारे ६५ लाख प्रवाशांना बसणार आहे.