मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याचे घोषित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला आहे.
१२ ते १४ जुलै असे तीन दिवस संपावर जाण्याची कर्मचा-यांनी जाहीर केले होते. हा तीनदिवसीय संप मुख्यमंत्र्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आलाय. सातवा वेतन आयोग हा जानेवारी २०१६ पासून लागू करण्यास सरकार तयार आहे, मात्र आर्थिक अडचण असल्याने अंमलबजावणीस मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितला आहे.
तर त्यासोबतच पाच दिवसांचा आठवडा, बाल संगोपन रजा आणि निवृत्तीचे वय ६० करण्याबाबत चार महिन्यात निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.