मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं गूढ आता एम्स रिपोर्टसोबत समोर आलं आहे. फॉरेन्सिक तपासात एम्सच्या ७ सदस्यांच्या पॅनलने सीबीआयला दिलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, सुशांतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच आहे.
मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी ८० हजार फेक अकाऊंट ओपन करण्यात आले. याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटने या फेक अकाऊंटची यादी तयार केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे फेक अकाऊंट भारतातील नसून हे इटली, थायलँड, फ्रान्स, इंडोनेशिया, टर्की सारख्या देशातून ऑपरेट केले जात होते.
1st FIR is related to defaming Mumbai Police Commissioner & abusing the force through social media platforms & another FIR has been lodged for using morphed image of official Twitter account of Mumbai Police Commissioner. We are probing both matters: DCP-Cyber Cell, Mumbai Police https://t.co/KbDN6biPgQ
— ANI (@ANI) October 6, 2020
तसेच काही अकाऊंट तर असे आहेत जे २०१० मध्ये तयार केले आहेत. मात्र त्यांना आता ऍक्टिव दाखवण्यात येत आहे. या सर्व अकाऊंटच्या माध्यमातून #justiceforSushant आणि #SSR हे दोन हॅशटॅग ट्रेंड करण्यात आले.
2 FIRs registered under IT Act against many social media account holders & fake accounts for defaming Mumbai Police Commissioner on different platforms like Twitter, Instagram & FB & using abusive language against him & the force: Rashmi Karandikar, DCP-Cyber Cell, Mumbai Police pic.twitter.com/78Gc6aPyn7
— ANI (@ANI) October 6, 2020
झी न्यूजशी बोलताना मुंबई पोलीस CP परमबीर सिंह यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधात प्रोपोगंडा तयार करण्यात आला. आता IT ऍक्टनुसार सायबर सेल फेक अकाऊंटची पूर्ण चौकशी करणार आहेत.
या प्रकरणात आता सायबर सेलने २ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अनेक सोशल मीडियावरील ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमांचा समावेश आहे. परमबीर सिंह यांनी यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणात IT ऍक्ट अंतर्गत ६७ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा खुलासा झाल्यानंतर मुंबई पोलिसांवर प्रश्न विचारणाऱ्यांवर आता शिवसेनेसोबतच काँग्रेसने देखील टीका केली आहे. काँग्रेस नेता आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी ट्विट करून,'मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या ८० हजार फेक सोशल मीडिया अकाऊंटची चौकशी झाली पाहिजे', अशी मागणी केली आहे.