TMC Recruitment: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
टाटा मेमोरियल सेंटरअंतर्गत रिसर्च नर्स/ क्लिनिकल नर्सची 2 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी नर्सिंग / जीएनएममधे डिप्लोमा केलेला असावा. तसेच उमेदवारांकडे कामाचा 1 वर्षांचा अनुभव असावा. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. उमेदवारांना मुंबई/खारघर येथे नोकरी करावी लागणार आहे.
पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 23 हजार ते 54 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
यासाठी उमेदवारांची कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. 18 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे.
BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी
उमेदवारांना मुलाखतीसाठी रुम नंबर 205, दुसरा माळा, सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिलॉजी, अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रिटमेंट, रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, सेक्टर 22,खारघर, नवी मुंबई-410210 या पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.
मुलाखतीला येताना उमेदवारांनी नोकरीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखेच्या नंतर पुन्हा मुलाखतीचे सत्र आयोजित करण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवारांना दिलेल्य दिवशीच मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी संसाधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण आणि पारदर्शकता सोसायटीच्या पॅनलवर केली जाणार आहे. याअंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
यासाठी 3 ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना, पदासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या कार्यालयाच्या www.aurangabad.gov.in या वेबसाईवर प्रसिध्द करण्यात आला आहे. यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद या पत्त्य़ावर पाठवायचे आहेत.