मुंबई : Taxi fare hike May Be Rs5 from June 1 in Mumbai : जूनपासून भाडेवाढीचा इशारा टॅक्सी संघटनांनी दिला आहे. सततच्या सीएनजी दरवाढीमुळे टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे संतापलेल्या टॅक्सी संघटनांनी 1 जूनपासून भाडेवाढ करणार असल्याचा इशारा दिला आहे. परिवहन विभागाने किमान 5 रुपये भाडेवाढीची मागणी केलीय. गेल्या काही दिवसात सीएनजीचे दर 51 रुपये 98 पैशांवरून 76 रुपयांवर गेले आहे. (Taxi associations warned of a Rs 5 fare hike from June 1 in Mumbai )
सीएनजी दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे टॅक्सी, रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. सीएनजी आणि पेट्रोल दरात सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ परवडणारी नसल्याने टॅक्सी, रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. खटुआ समितीनुसार भाडेवाढीची चाचपणी परिवहन विभागाने सुरु केली आहे.
दरम्यान, किमान दोन ते तीन रुपयांनी रिक्षाचे भाडे वाढवण्याचा विचार सुरु असून टॅक्सी भाडेदर अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र टॅक्सी संघटनांनी किमान 5 रुपये भाडेवाढीची मागणी केली आहे. लवकरच होणाऱ्या मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्याआधीच टॅक्सी संघटनांना भाडेवाढ द्या अन्यथा आम्हाला थेट भाडेवाढ करावी लागेल. 1 जूनपासून ही भाडेवाढ करु, असा इशारा दिला आहे.
सीएनजी दरात होणाऱ्या वाढीमुळे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने टॅक्सी भाडे वाढवण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. सध्या सीएनजीच्या दरात 35 टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली असून त्यामुळे परिवहन विभागाने टॅक्सी दरात किमान पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे.