हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड, संतप्त प्रवाशांचं आंदोलन

हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने संतप्त प्रवाशांनी चेंबूर रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. रेल्वे ट्रॅकवर उतरुन प्रवाशांनी रेल रोको केला.

Updated: Sep 21, 2017, 02:35 PM IST
हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड, संतप्त प्रवाशांचं आंदोलन title=

मुंबई : हार्बर रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने संतप्त प्रवाशांनी चेंबूर रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. रेल्वे ट्रॅकवर उतरुन प्रवाशांनी रेल रोको केला.

प्रवाशांनी तासभर लोकल वाहतूक रोखून धरली. त्यामुळे उशिरा धावत असलेल्या लोकल आणखी रखडल्या. चेंबूर ते सीएसएमटी अशी विशेष लोकल चालवण्यात आली. तसंच आंदोलनकर्त्या प्रवाशांना बाजूला करण्यात आलं. मात्र प्रवाशांच्या या आंदोलनामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे.