मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेत आज भरगच्च कामकाज दाखवण्यात आले आहे. अनेक विषय पटलावर आहेत. त्यांना मंजुरी मिळणार का, याकडे लक्ष लागलेय.
बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, त्याचबरोबर दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोअरमधल्या दिघी बंदरासाठी जमीन संपादन, ७ वा वेतन आयोग लागू करण्याविषयीचा मुद्दा आदी विविध विषयांवर कामकाज अपेक्षित आहे.
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरही चर्चा होईल. याप्रस्तावात राज्यातील कायदा सुव्यवस्था सुधारणेवर चर्चा होणार आहे. तसेच विधानसभेत आज पुन्हा एकदा प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंच्या राजीनाम्याची मागणीसाठी विरोधक अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे.