मुंबई : शिवसेनेनं निवडणुकीसाठी एकत्र यावं असं खुले आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटल यांनी केला आहे. काँग्रेसला मदत व्हावी असे शिवसेना का करत आहे, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
त्याचवेळी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार तोंडसुख घेतले. विरोधी पक्षाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आहे. सत्तेवर असताना विरोधक जानेवारी महिन्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करायचे, असे ते म्हणालेत.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या तुलनेत भाजप सरकार ऑक्टोबरमध्ये दुष्काळसदृशाची घोषणा करत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ राज्यात गंभीर असणार आहे. या विषयावर सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.