बिग बॉस सीझन-५ ची विजेती जूही परमार

रियाल्टी शो बिग बॉस सीझन-५ ची विजेता ठरली आहे अभिनेत्री जूही परमार. जूही परमारला एक करोड रुपये रोख आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. महक चहलला उपविजेती घोषीत करण्यात आलं.

Updated: Jan 8, 2012, 08:42 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

रियाल्टी शो बिग बॉस सीझन-५ ची विजेता ठरली आहे अभिनेत्री जूही परमार. जूही परमारला एक करोड रुपये रोख आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. महक चहलला उपविजेती घोषीत करण्यात आलं.

 

बिग बॉस सीझन-५ च्या ग्रँड फिनालेच्या विजेतेपदासाठी पाच प्रतिस्पर्ध्यांमध्ये काँटे की टक्कर होती. अमर उपाध्याय, आकाशदीप सहगल (स्काय) आणि सिद्धार्थ भारद्वाज हे एका मागोमाग स्पर्धेतून बाहेर गेले आणि शेवटच्या टप्प्यात जूही आणि महक दोघीच जणी उरल्या. शोचा हॉस्ट सलमान खान आणि संजय दत्त यांनी जूही परमारला विजेत घोषित केलं आणि पुरस्कार प्रदान केला. जूहीने छोच्या पदड्यावक 'कुमकुम'मधल्या प्रमुख भूमिकेतून आपली स्वत:ची ओळख निर्माण केली. महकने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरवात केली आणि सलमानच्या वॉन्टेडमध्ये तिने भूमिका केली

 

. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये मलाइका अरोरा खानने मुन्नी बदनाम हुई, छैंया-छैंया आणि होंठ रसीले सारख्या फेमस आयटम नंबर्स धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला. एकेकाळी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून धमाल उडवलेल्या राखी सावंतने पण डान्स परफॉर्मन्स सादल केला. करण जोहर आणि करण जोहर हे एक मैं ओर एक तू च्या प्रमोशनसाठी आले होते. या सीझनमधला स्पर्धक शक्ति कपूरने फिनालेमध्ये भाग घेतला. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये सीझन ५ चा काही काळ हॉस्ट राहिलेला संजय दत्तने सलमान खानची साथ दिली.