www.24taas.com, मुंबई
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट आणि इतर १५० व्यवस्थापन शास्त्र महाविद्यायांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन ऍडमिशन टेस्ट (कॅट) २०११ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
आज बुधवारी सकाळी कॅट २०११ चे निकाल आयआयएमच्या www.catiim.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले. कॅटच्या परिक्षार्थींनी पोर्टलवर डाव्या बाजूला असलेले हिरवं बटन दाबल्यानंतर त्यावर कॅट २०११ रिझल्ट्स असं लिहिलं आहे. यासाठी कॅट रजिस्ट्रेशन क्रमांक आणि इमेल ऍड्रेस आवश्यक आहे. परिक्षार्थींनी निकालाची प्रिंट प्रत काढून घ्यावी.
मागच्या वर्षी संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर लोकांनी भेट दिल्याने ती क्रॅश झाली होती. ज्यांना संकेतस्थळावर निकालासाठी संपर्क साधता येणार नाही त्यांच्यासाठी टोल फ्री नंबरची व्यवस्था करण्यात आली. टोल फ्री नंबर आहे 1 800 103 7383. कॅट उत्तीर्ण झालेल्यांसाठी आयआयएमने आता ग्रुप डिसकशन ऐवजी निबंध लिहिण्याची परिक्षा घेण्याचं ठरवलं आहे आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखतींना सामोरं जावं लागेल. तसंच कॅटच्या गुणांना कमी महत्व देण्यात येतं आणि कामाचा अनुभव तसंच नॉन इंजिनिअर्सना अधिक प्राधान्यक्रम देण्यात येतो.