गोव्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

गोव्यात मतदानादरम्यान काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. पणजीत मतदान केंद्रावर ही धक्काबुक्की झाल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे.

Updated: Mar 3, 2012, 11:43 AM IST

www.24taas.com, पणजी

 

गोव्यात मतदानादरम्यान काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.  पणजीत मतदान केंद्रावर ही धक्काबुक्की झाल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे.

 

 

गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरूंय. बीजेपीच्या वैदेही नाईक यांच्या गळ्यात बीजेपीचं आयकार्ड होतं. पोलिंग परिसरात त्या येताच काँग्रेसचे पणजीचे उमेदवार यतीन परीख यांनी त्यांच्या गळ्यातून आयकार्ड हिसकावून घेतलं. त्यामुळे बीजेपीआणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या शाब्दिक चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. याप्रकरणी वैदेही नाईक आणि यतीन परीख यांच्याविरोधात पणजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

गोवा विधानसभेच्या ४०जागांसाठी सकाळपासून मतदानाला सुरूवात झालीय. सकाळापासून बहुतांश मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या असून मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय.२१५उमेदवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत असून १०  लाख २५हजार ४९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी १ हजार ४१२ मतदान केंद्र असून यातील११४ मतदानकेंद्र अतिसंवेदनशील आहेत. मतदानासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं युती केली असून सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेस, युजीडीपी, गोवा विकास पार्टीसारखे १९ पक्ष रिंगणात आहेत. सकाळीच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पणजीत मतदान केलं. यावेळी युतीची सत्ता येईल असा दावा त्यांनी केला आहे..