www.24taas.com, नवी दिल्ली
जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या मालमत्ता जसे कर्जरोखे (बाँड्स), समभाग, म्युच्युअल फंड्स, स्थावर मालमत्ता वगैरे विकून त्यावर नफा कमावता. यात तुमची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यातील तफावत अर्थात लाभाला ‘कॅपिटल गेन्स/ भांडवली लाभ’ म्हटले जाते.
या लाभावरील करदायित्त्वाला भांडवली लाभ कर म्हटले जाते. या भांडवली लाभ कराचेही दोन प्रकार आहेत. ते म्हणजे अल्प मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर होय. तुम्ही मालमत्तेच्या खरेदीपश्चात ३६ महिन्यांच्या आत तिची विक्री करून फायदा कमावला असेल तर तो अल्प मुदतीचा भांडवली लाभ ठरतो.
म्युच्युअल फंड आणि समभागांच्या बाबतीत हीच मर्यादा १२ महिन्यांचा आत अशी आहे. त्या उलट ३६ महिन्यांपश्चात होणाऱ्या विक्रीतून कमावलेल्या फायद्याला दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर लागू होतो. या दोन्ही प्रकारच्या भांडवली लाभांवर २० टक्के प्राप्तिकर निश्चित केला गेला आहे. परंतु प्राप्तिकर कायद्याअंतर्गत दीर्घ मुदतीच्या भांडवली लाभ कराचे दायित्व कमी करण्याची मुभा करदात्याला दिली गेली आहे त्याला ‘इंडेक्सेशन’ म्हटले जाते.