यूपीतील रेल्वे अपघातात १५ ठार

उत्तर प्रदेशात हाथरस येथील रेल्वे दुर्घटनेत १५ प्रवासी ठार झाले आहेत. आज सकाळी हाथरस येथे रेल्वेची धडक कारला बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे क्रॉसिंगजवळ झाला.

Updated: Mar 20, 2012, 10:41 AM IST

www.24taas.com, हाथरस

 

 

उत्तर प्रदेशात हाथरस येथील रेल्वे  दुर्घटनेत १५   जण ठार झालेत. आज सकाळी हाथरस येथे रेल्वेची धडक कारला बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे क्रॉसिंगजवळ झाला.  यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अलिगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

मेंडू रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेचे फाटक नाही. त्यामुळे अपघातानंतर रेल्वे फाटक लावण्याची मागणी करीत स्थानिकांनी रेलरोको आंदोलन केले. रेल्वे कांशिरामनगरजवळ केसगंज येथे जात होती.  रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक आर. पी. कौशिक यांनी अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

हाथजल येथे मथुरा - केसगंज पॅसेंजर  रेल्वे जात होती. यावेळी कारचालक चारचाकी घेऊन रेल्वे पटरी क्रॉसिंग करीत होता. मात्र, पटरी क्रॉस  कारला करता आली नाही. या कारमधून प्रवास करणाऱ्यांवर मृत्यूचा घाला झाला. कारचालक जागीच ठार झाला तर अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना अलिगड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, दुर्घटनास्थळी प्रशासनाच्या अधिराऱ्यांनी भेट दिलेली नाही.

 

 

दरम्यान, यापूर्वीही मेंडू रेल्वे क्रॉसिंगजवळ भीषण अपघात झाला होता, असे त्यांनी सांगितले.  माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी २०१५ पर्यंत रेल्वे क्रॉसिंग  बंद करण्याची योजना असल्याचे सांगितले होते.