www.24taas.com, नवी दिल्ली
समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील प्रमुख संशयित कमल चौहान याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. कमल चौहानला नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) अटक केली.
चौहान याची पोलिस चौकशी झाल्यानंतर नॅशनल इन्सवेस्टिगशन एजन्सीने त्याला ताब्यात घेतलं. चौहान समझोता एक्सप्रेस बॉम्ब स्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौहान आणि अजून एक फरार असलेल्या संशयिताने समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवला होता.
चौहानला नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने मध्य प्रदेशातील इंदोर येथून शनिवारी ताब्यात घेतलं होतं. समझोता प्रकरणातील रामजी कलसांगरा आणि संदीप डांगे यांचा चौहान हा निकटचा सहकारी आहे. एनआयएने रामजी आणि संदीप यांची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे इनाम जाहीर केलं आहे. समझोता एक्सप्रेसमध्य १८ फेब्रुवारी २००७ साली झालेल्या बॉम्बस्फोटात साठहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला होता.
दिल्ली आणि लाहौर दरम्यान धावणाऱ्या समझोता एक्सप्रेसच्या दोन डब्यात बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. हरियानातील पानीपत नजीकच्या दिवाना इथे हा स्फोट झाला होता. या प्रकरणी एनआयएने स्वामी असिमानंद, साध्वी प्रग्या, सुनील जोशी, संदीप डांगे, लोकेश शर्मा आणि रामचंद्र कलसांगरा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे.