सरकारी लोकपालची राज्यांवर गदा - जेटली

केंद्राच्या सरकारी लोकपालमुळे राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा येण्याची भीती आहे. लोकपाल विधेयकातल्या विसंगतींवर भाजपाचे अरूण जेटली यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सक्षम लोकपाल आणण्याची मागणी त्यांनी केली.

Updated: Dec 29, 2011, 01:32 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

केंद्राच्या सरकारी लोकपालमुळे राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा येण्याची भीती आहे. लोकपाल विधेयकातल्या विसंगतींवर भाजपाचे अरूण जेटली यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सक्षम लोकपाल आणण्याची मागणी त्यांनी केली.

 

लोकपाल विधेयक आज राज्यसभेत नारायण सामींनी सादर केलं. लोकपालवर ८ तास चर्चा चालणार आहे. त्यानंतर  मतदान होणार आहे. लोकपाल बिलासाठी मंत्रिगट स्थापन  करण्यात आला आहे.  भ्रष्टाचारविरोधात सरकारने कडक पाऊल उचललं आहे. लोकपाल बिलासंबंधी विरोधकांशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली आहे. सर्व सहमतीने तयार केलं लोकपाल विधेयक सादर करण्यात आल्याची माहिती नारायण सामी यांनी दिली.

 

लोकपाल बिलाला विरोधकांनी विरोध केला आहे. विरोधामुळे राज्यसभेत आज सरकारची अग्निपरीक्षा दिसून येत आहे.  लोकपाल विधेयकमंजूर करण्यासाठी सरकारची कसोटी लागत आहे.  राज्यसभेत पंतप्रधानांच्या गैरहजेरीवर भाजपाचा आक्षेप घेतला. त्यामुळे दहा मिनिटांसाठी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर चर्चेला सुरूवात होताच सत्ताधारी सदस्य आक्रमक होऊन विरोधकांना जशासचसे उत्तर दिल्याने सभागृहात वातावरण चांगलेच तापलं होतं.

 

सरकारने आणलेलं विधेयक कमजो असून साऱ्या देशाचं लोकपालविधेयकाकडे लक्ष लागलं आहे.  कमकुवत लोकपाल बिल बनवणाऱ्या सरकारला जता माफ करणार नाही.  कमकुवत लोकपाल बिलाला घटनात्मक दर्जा देऊन काय उपयोग?  विरोधकांवर लक्ष्य ठेवण्यासाठीच राज्यांवर लोकपाल आणल्याचा आरोप जेटली यांनी केला.

 

मनु सिंघवी यांनी विरोधकांवर हल्लाबोल परतवून लावला. ही भाजपची लोकपालबाबत दुटप्पी भूमिका आहे, असा प्रतिआरोप केला.  लोकपाल विधेयक मंजूर न करण्यासाठी विरोधकांच्या सबबी सुरू आहेच, टीका मनु सिंघवी यांनी केली.

 

दरम्यान, राज्यसभेत लोकपाल विधेयक  पास करण्यासाठी सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बसपा, राजद आणि सपाच्या हातातआकड्यांच्या खेळासाठी सरकारची धावाधाव सुरू आहे. मात्र,  राज्यसभेत लोकपाल विधेयक पास होईल असा विश्वास हरिश रावत यांनी व्यक्त केलाय.

 

[jwplayer mediaid="20587"]