बालकाची ३६ तासानंतर मृत्युशी झुंज व्यर्थच.....

उमरगा तालुक्यातल्या कोथळी गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात तब्बल ३६ तासांनतर यश मिळालं आहे. मात्र या मुलाचा जीव वाचू शकला नाही.

Updated: Mar 2, 2012, 10:51 AM IST

www.24taas.com, उस्मानाबाद

 

उमरगा तालुक्यातल्या कोथळी गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात तब्बल ३६ तासांनतर यश मिळालं आहे. मात्र या मुलाचा जीव वाचू शकला नाही. गेल्या ३६ तासांपासून मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. रेहान बेग असं मुलाचं नाव आहे. तो त्याच्या आईसह बसवराज मायाचारी यांच्या शेतात गेला होता. त्याची आई तिथं शेतमजुरी करण्यासाठी गेली होती.

 

आई काम करत असताना तो खेळत खेळत उघड्या बोअरवेलमध्ये  पडला. त्याच्या ओरडण्यामुळं तो बोअरमध्ये पडल्याचं लक्षात आलं. जेसीबी, पोकलँडच्या मदतीनं रेहानला बाहेर काढण्यात आलं. मात्र त्याला बाहेर काढण्यात फारच उशीर झाला. त्यामुळे त्याचा जीव वाचविण्यात यश आलं नाही.

 

संध्याकाळी ५ च्या सुमारास खेळता खेळता रोहन  बंद पडलेल्या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांबरोबर प्रशासनही युद्ध पातळीवर काम करत होतं. त्याला तिथपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचा प्रयत्न स्थानिक डॉक्टर करत होते. चिमुकल्या रेहानचा जीव वाचवण्याचं काम रात्रभर चालू होतं. त्या बोअरवेलचं तोंड उघडं राहिल्यामुळे रेहानचा अपघात झाला.