कल्याणात पोलीस कर्मचा-याला मारहाण

काही दिवसांपूर्वी भिवंडीतील एका वाहतूक पोलीस कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमधे गुरूवारी तीन मद्यपी युवकांनी कल्याण सुभाष चौक परिसरातील ऑन ड्यूटी उपस्थित ट्राफिक पोलीस कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Updated: May 18, 2012, 10:01 AM IST

www.24taas.com, कल्याण

 

काही दिवसांपूर्वी भिवंडीतील एका वाहतूक पोलीस कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमधे गुरूवारी तीन मद्यपी युवकांनी कल्याण सुभाष चौक परिसरातील ऑन ड्यूटी उपस्थित ट्राफिक पोलीस कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

 

सुमीत,त्याचा भाऊ सचिन आणि त्यांचा एक मित्र दारूच्या नशेत मदियधुंद अवस्थेत सुभाष चौकात पोचले.त्यांनी वॅगन या गाडीला ठोकर मारली आणि तियानंतर एका महिलाला देखील ठोकलं.ऑन ड्युटी असलेल्या शांताराम कसबेनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना या दारुड्यांनी शिवीगाळ केली.