www.24taas.com, नवी मुंबईत
नवी मुंबईत स्थलांतर झालेल्या दुष्काळग्रस्तांना राजकीय पक्षांनी मदतीचा हात पुढं केलाय. त्यांना अन्नधान्यांबरोबरच औषधांचीही मदत केलीय. तसंच येथून पुढंही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचं राजकीय पक्षांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नवी मुंबईत आश्रयाला आलेल्या , यवतमाळ आणी वसीम जिल्यातील दुष्काळ ग्रासताना पालकमत्री गणेश नाईक यांनी तात्पुरती नोकरी देण्याचे आदेश दिले आहेत . सयुक्त वन व्यव स्ताप नाचाया माध्यमातून नवी मुंबईत पावणे , अडवली , भू तवली येथे वन निर्माण करण्याचे काम सुरु आहे . या कामात याआदी ९० कामगारांचा समावाश आहे . यामध्ये या दुष्काळ ग्रासताना देखील समाव्नायात येतील , असे पालकमत्री गणेश नाईक यांनी भेटण्यास आलेल्या दुस्काल्ग्र्सताना सांगितले . यावेळी या दुष्काळ ग्रास्तांच्या निवाऱ्याची सोय करण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्राचा ग्रामीण भाग दुष्काळानं होरपळून निघत असल्यानं दुष्काळाग्रस्तांवर स्थलांतर करण्याची वेळ आलीय. वाशीम, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक दुष्काळग्रस्त कुटुंबांनी आपलं गाव सोडून सध्या नवी मुंबईत आश्रय घेतलाय. इथंही त्यांची होत असलेली उपासमार पाहून त्यांच्या मदतीला राजकीय पक्ष पुढं आलेत. या कुटुंबाना कॉंग्रेस,शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांनी डाळ, तांदूळ, भाजी,चादरी तसंच औषधे देऊन मदतीचा हातभार लावला.
पाणी नसल्यामुळं शेतीतून उत्पन्न नाही तसंच रोजगाराच्या संधी नसल्यानं स्थलांतराशिवाय पर्याय नसलेली हि कुटुंबे आता मिळेल ते काम मिळवून पोट भरतायत. आजारी असलेल्या दुष्काळग्रस्तांना पालिकेच्या डॉक्टरांनी तपासणी करून औषधे दिली. या दुष्काळग्रस्तांना तात्पुरता निवारा आणि रोजगारासाठीही राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जाणार आहेत.