www.24taas.com, जळगाव
नियोजनाच्या आणि निधीच्या दुष्काळामुळं राज्यातले अनेक प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेत. सगळ्यांनाच खूश करण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळं नव्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि जुन्या प्रकल्पांकडं दुर्लक्ष असा प्रकार सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातल्या पाडळसरे प्रकल्पाचीही तीच गत झालीय
13 टीएमसी जलसाठ्य़ाची क्षमता असलेला आणि धुळे जिल्ह्यात शिरपूर, जळगाव जिल्ह्यातले चोपडा,अंमळनेर, धरणगाव अशा चार ते पाच तालुक्यांना वरदान ठरणारा हा पाडळसरे प्रकल्प. 1999 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प निधीअभावी अजूनही पूर्ण झालेला नाही. सुरूवातीला प्रकल्पाची किंमत अवघी 144 कोटी रुपये होती. ती आता तब्बल 1128 कोटी रुपयांवर गेलीय. 2003 पर्यंत प्रकल्पाचं काम सुरू होतं. त्यानंतर अनेक वर्ष प्रकल्पाला निधीच मिळाला नाही. आजही अत्यंत तुटपुंज्या निधीमुळं प्रकल्पाचं काम रखडत सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी भरघोस निधी देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र ते हवेतच विरलं. प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होऊ शकतो.
सध्या प्रकल्पासाठी 11 हजार कोटी रुपयांची गरज असताना फक्त 500 कोटी रुपये मिळालेत. त्यामुळं पुढचं काम रखतंय. नवे प्रकल्प हाती घेण्याऐवजी अशा जुन्या प्रकल्पाचं काम पूर्ण करणं गरजेचं आहे. तरचं सिंचनाचं अपेक्षी उद्दिष्ट गाठता येईल.