www.24taas.com, सातारा
मुंबई आणि कोकणात पावसानं हजेरी लावली असली तरी साता-यातली जनता मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस नसल्यानं शेतकरीवर्ग चिंतेत आहे. पाऊस पडावा यासाठी सातारा शहरात चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलं.
पारंपरिक पद्धतीनं हा लग्नसोहळा पार पडला. अगदी ख-या लग्नाप्रमाणं या लग्नाची तयारी करण्यात आली होती. फुलांचे हार, मुंडावळ्या, गुलाबाच्या फुलांचे गुच्छ, व-हाढी आणि वाजंत्री अशा थाटात हा लग्नसोहळा पार पडला.
लग्नानंतर नवरदेवाची वरातही काढण्यात आली. गाढवाचं लग्न लावल्यानं पाऊस पडेल अशी इथल्या जनतेची समजूत आहे. त्यामुळे गाढवाच्या लग्नानंतर आता तरी पाऊस पडणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.
दरम्यान, पावसाने आपला मोर्चा दिल्लीच्या दिशेने वळविला आहे. दिल्लीत खूप दिवस दडी मारल्यानंतर हजेरी पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.