जुन्या गाड्यांचा टॉप गिअर

जुन्या कार पाहण्याचा छंद असेल तर पुण्यातल्या बेवेरली हिल्स हॉटेलला भेट द्या. इथल्या सुभाष सनस क्लासिक ऍण्ड विन्टेज कार म्युझियममध्ये १०० वर्षापूर्वीची कार देखील पहायला मिळेल.

Updated: Nov 6, 2011, 03:40 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

जुन्या कार पाहण्याचा छंद असेल तर पुण्यातल्या बेवेरली हिल्स हॉटेलला भेट द्या.  इथल्या सुभाष सनस क्लासिक ऍण्ड विन्टेज कार म्युझियममध्ये १०० वर्षापूर्वीची कार देखील पहायला मिळेल. तसंच अनेक नामवंत व्यक्तींच्या जुन्या गाड्याही पहायला मिळतील.  अमेरिकन पोलीस प्रमुखांची १९३४ सालची हिरव्या रंगाची ऑस्टीन इथे जपून ठेवण्यात आली आहे.  दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९६३ मधली लाल रंगाची convertible (MRY-6515)  शानदार गाडी तसेच बिग बी अमिताभ यांची १० वर्ष जुनी चमकदार सफेद मर्सिडीज इथे ठेवण्यात आल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची ९ नंबर असलेली पांढरी मर्सिडीज पाहता येईल. त्याशिवाय अनेक कलाकारांच्या, राजकारण्यांच्या आणि नेत्यांच्या जुन्या गाड्या इथे पहायला मिळतील. हा खर्चिक छंद जोपासायला थोडं कठीण आहे. तसेच या गाड्यांची काळजी घेणंही अवघड असतं. मात्र जुन्या गाड्या पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे म्युझियम एक पर्वणीच आहे.