दुष्काळी भागात पाण्यासाठीही लाच!

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावात टॅंकर लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या आटपाडीच्या महसूल विभागातील कारकून आणि तलाठयाला अटक करण्यात आलीय.

Updated: Aug 8, 2012, 11:24 PM IST

www.24taas.com, सांगली

सांगली जिल्ह्यातील  दुष्काळी  गावात टॅंकर लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या आटपाडीच्या महसूल विभागातील कारकून  आणि तलाठयाला अटक करण्यात आलीय.

 

शिवाजी  मलमे  आणि  तलाठी  भूषण वीर अशी पकडलेल्या दोघांची नावं आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या  अधिकार्यांनी या  दोघाना दिघंची येथून लाच घेताना रंगे हात पकडलं. कारकून मलमे याच्याकडं टॅंकर सुरू करणं, बंद करणं, टँकरना पाणी भरण्याचं ठिकाण देणं ही कामे होती. या दोघांच्या बाबत प्रचंड तक्रारी होत्या. तक्रारदार संजय  पाटील यांचा पाण्याला टॅंकर होता. तो कोणतेही कारण नसताना बंद केला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी लिपिक मलमेने दोन हजारांची मागणी केली होती. यानंतर पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली. या तक्रारीनंतर मनले आणि भूषण वीर या दोघांना दिघंची इथं सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली.