www.24taas.com, पुणे
पुण्याच्या पर्वतीवरील उद्यानासाठी संपादित करण्यात आलेल्या भुखंडाच्या मोबदल्यापोटी जागा मालकाला १०० % टीडीआर देण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे.
पर्वतीवरील ६६ हजार ३७२ चौरस मीटर जागा महापालिकेनं उद्यानासाठी ताब्यात घेतली होती. त्याचा मोबदला म्हणून केवळ ४ टक्के टीडीआरचा नियम डावलून १०० टक्के टीडीआर देण्यात आला होता. शिवसेना नगरसेवक श्याम देशपांडे तसंच आमदार विनायक निम्हण यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडं दाद मागितल्यानंतर त्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीविरुद्ध जागा मालकांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवलाय. पुणे महापालिकेला हा मोठा धक्का समजला जातोय.