व्यासांच्या महाभारताच्या अखेरच्या अध्यायाची समाप्ती

Updated: Nov 4, 2011, 05:42 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे जावई गिरीश व्यास यांनी पुण्यातील वादग्रस्त इमारत अखेर महापालिकेकडं हस्तांतरित केलीय. जमिनीवरील आरक्षण बदलून ही इमारत बांधली गेली होती. मात्र त्याला काही सामाजिक संघटनांनी विरोध करत कोर्टात आव्हान दिलं होतं. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं याबाबत निकाल देऊन इमारत जमीनदोस्त करावी अथवा महापालिकेकडं हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज महापालिकेनं या वादग्रस्त इमारतीचा ताबा घेतला असून लवकरच या इमारतीत शाळा सुरु करण्यात येणाराय.

 

शाळेसाठी राखीव असलेल्या या भूखंडाचे आरक्षण मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी असताना बदलण्यात आलं होतं. या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर मोठा गदारोळ माजला आणि शिवसेना प्रमुखांनी मनोहर जोशींना राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. अखेर जावयांच्या उपदव्यापापायी मनोहर जोशींना पायउतार व्हावं लागलं. गेली अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित होता.

Tags: