कर्णिक म्हणजे कोमसाप नव्हे - बागवे

साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीला आता वादाचे रंग चढू लागलेत. साहित्य संमेलन आयोजनाबाबत विश्वासात न घेतल्यानं मधू मंगेश कर्णिक यांनी नाराजी व्यक्त होती. यानंतर संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक बागवेंनी कर्णिकांना डिवचलंय.

Updated: Jul 13, 2012, 12:12 PM IST

www.24taas.com, मुंबई

साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीला आता वादाचे रंग चढू लागलेत. साहित्य संमेलन आयोजनाबाबत विश्वासात न घेतल्यानं मधू मंगेश कर्णिक यांनी नाराजी व्यक्त होती. यानंतर संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक बागवेंनी कर्णिकांना डिवचलंय.

‘मधू मंगेश कर्णिक म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद नव्हे’ असं बागवेंनी म्हटलंय. त्यामुळं आणखी एक नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. फक्त कर्णिक यांनाच नव्हे तर आपल्या खळबळीत वक्तंव्यांतून बागवेंनी ह. मो. मराठेंनाही टार्गेट केलंय. ‘ह. मो. मराठेंचं वय काय’, असा सवाल अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक बागवे यांनी उपस्थित केलाय. या वयात मराठे साहित्य प्रसारासाठी कसे फिरणार? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. तसंच या ७५ वर्षे उलटल्यानंतर कसली ऊर्जा असणार असंही त्यांनी म्हटलंय. तर पलटवार करत ह.मो. मराठेंनी आपण ७२ व्या वर्षीही तरुण असल्याचं खरमरीत उत्तर बागवेंना दिलंय.